कोल्हापूर (प्रतिनिध) : गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात कोल्हापुरातील अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या गणरायाला निरोप देण्यात आला. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी संचालक वेशभूषाकार व प्रॉडक्शन्स मॅनेजर श्याम काणे यांच्या हस्ते श्री’ चीं आरती करण्यात आली. यावेळी जयप्रभा स्टुडिओ वाचण्यासाठी गणरायाकडे प्रार्थना करण्यात आली.

संस्थेचे प्रमुख कार्यवाह रणजित जाधव, सहखजिनदार शरद चव्हाण, संचालक सतीश बिडकर, राहुल राजशेखर, विजय ढेरे, अमर मठपती, सुभाष कांबळे, राहुल मोरे, राज पाटील, उत्तम गणाचार्य, मंगेश मंगेशकर, रमेश पोवार  गिरीश आरेकर, हणमंत जोशी, बबन बिरंजे, नम्रता गोडबोले, अरूण पाटील, सिद्धेश मंगेशकर व प्रमुख व्यवस्थापक रवींद्र बोरगावकर आणि मान्यवर उपस्थित होते. ‘मराठी चित्रपट सृष्टीवर ओढवलेले संकट दूर होऊ दे’, ‘लवकरच जयप्रभा स्टुडिओ चित्रीकरणासाठी खुला होऊ दे’ जयप्रभा स्टुडिओ वाचलाच पाहिजे,’ अशी प्रार्थना बाप्पापुढे करण्यात आली.