Breaking News

 

 

मला कितीही शिव्या द्या, पण देशाचे तुकडे होऊ देणार नाही ! : पंतप्रधान

जम्मू (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. मला कितीही शिव्याशाप दिले तरी देशाचे दोन तुकडे होऊ देणार नाही. फारूख अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांनी माझ्यावर जरूर टीका करावी, पण फुटीरवाद्यांच्या सुरात सूर मिसळणे बंद करावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते आज काश्मीरमधील कठुआ येथे प्रचारसभेत होते.

यावेळी त्यांनी विविध मुद्यावरून काँग्रेसला लक्ष्य केले. न्याय योजनेच्या नावाखाली काँग्रेस देशवासियांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही मोदींनी केलाय. काँग्रेस आणि महाआघाडीच्या नेत्यांच्या राष्ट्रभक्तीचा बुरखा फाटल्याचा घणाघातही मोदींनी केला आहे. मोदींनी जम्मू-काश्मीरमधील काश्मीर पंडितांच्या पलायनाचाही मुद्दा उपस्थित केला. काँग्रेसच्या धोरणांमुळेच काश्मीरी पंडित बंधू-भगिनींना आपले घर सोडावे लागले. काश्मीरी पंडितांवर होणाऱ्या अत्याचारांकडे त्यांनी दुर्लक्ष केले असल्याची टीकाही काँग्रेसवर करण्यात आली. 

996 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश