Breaking News

 

 

…आणि त्याने केले चक्क ‘पायाने मतदान’

अदिलाबाद (वृत्तसंस्था) : निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव आहे, असे म्हटले जाते. भारताच्या लोकतंत्राला बळकटी येण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे. परंतु, अनेकजण हल्ली आपला मतदानाचा हक्क बजावत नाहीत. अशा परिस्थितीत एका २५ वर्षीय तरुणाने हात नसतानाही त्याने चक्क पायाने मतदान करत एक नवा आदर्श घालून दिला आहे. तेलंगाणा राज्यातील आदिलाबाद प्रभागात झालेल्या मतदानात जाकिर पाशाने हे मतदान केले आहे.

तेलंगाणा राज्यात मतदानाविषयी निरुत्साह पाहायला मिळतो. अशा परिस्थितीत दोन्ही हात नसलेला जाकिर मतदान केंद्रावर पोहोचला आणि त्याने सर्व औपचारिकता पायाने पूर्ण करत मतदान केले. हे पाहून तिथे कर्तव्य बजावत असलेले मतदान कर्मचारीही अचंबित झाले. पाशाने पायाने मतदान केल्याची बातमी सोशल मीडियावर पोहचली आणि त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. तर अशा तरुणांकडून मतदान करण्याची प्रेरणा मिळते, अशा प्रतिक्रियाही नेटकऱ्यांमधून उमटताना दिसत आहेत.357 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा