Breaking News

 

 

‘पंतप्रधानपदासाठी मोदींंपेक्षा गडकरी कधीही बरे…’

मुंबई (प्रतिनिधी) : काही दिवसांपूर्वी नसिरुद्दीन शहा, कोंकणा सेन-शर्मा, अमोल पालेकर, लिलीट दुबे यासह सिनेसृष्टीतील सुमारे ६०० कलाकार, तंत्रज्ञांनी भाजपला मतदान करू नका, असे आवाहन केले होते. यामध्ये दिग्दर्शक अनुराग कश्यपचाही समावेश होता. आता अनुराग कश्यपने पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नितीन गडकरी योग्य व्यक्ती आहेत, असे ट्वीट करून नवा वाद निर्माण केला आहे. या ट्वीटची सोशल मिडियावर चांगली चर्चा रंगली आहे.

अनुराग कश्यपने यापूर्वीही पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधत त्यांच्यावर टीका केली आहे. यावेळी अनुरागने लोकसभा निवडणुकांचं निमित्त साधत पंतप्रधान पदासाठी मोदींपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी योग्य असल्याचं म्हटलं आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या व्यतिरिक्त नितीन गडकरी हेदेखील पंतप्रधान पदासाठी योग्य व्यक्ती आहेत. खरं तर साऱ्याच पक्षांमध्ये भ्रष्टाचार हा होत असतो. मात्र आता या भ्रष्टाचाराचं स्वरुप बदललं आहे. या भ्रष्टाचाराला तुम्ही किंवा आम्ही आळा घालू शकत नाही. देशातील राजकारणातून भ्रष्टाचाराचा नायनाट करणं शक्य नसलं तरी सांप्रदायिकता, द्वेष आणि भीतीचं राजकारण हे नक्कीच नष्ट होऊ शकतं”, असं अनुराग म्हणाला.

काही दिवसांपूर्वी मोदी सरकार आणि त्यांच्या मित्र पक्षांना मत न देण्याचं आवाहन करणारं एक पत्र ६०० कलाकारांनी दिलं होतं. या पत्राला एक आठवडाही उलटत नाही. तोच ९०० कलाकार मोदींच्या पाठिंब्यासाठी उभे राहिले आहेत. त्यामुळे कलाविश्वामध्येही मोदी समर्थक आणि मोदी विरोधक असे दोन गट पडले आहेत

1,068 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश