Breaking News

 

 

दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेने जम्मू-काश्मीरमध्ये रेड अलर्ट !

श्रीनगर (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा पुलवामासारखा दहशतवादी हल्ला होण्याची भीती असून रेड अलर्ट जारी कऱण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणांना गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू श्रीनगर महामार्गावर दहशतवादी आत्मघाती हल्ला करु शकतात. गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट जारी केला असून दहशतवादी हल्ल्यासाठी दुचाकीचा वापर करु शकतात अशी माहिती दिली आहे. त्यामुळे सुरक्षा वाढवण्यात आली असून सुरक्षा दलांच्या हालचालींवर स्थगिती आणण्यात आली आहे. तसंच श्रीनगरमध्ये मोबाइल आणि इंटरनेट सेवेवर बंदी आणण्यात आली आहे.

दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर सकाळी ९ वाजण्याआधी सुरक्षा यंत्रणांच्या हालचालींवर बंदी आणण्यात आली. ३० मार्च रोजी बनिहाल येथे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर सीआरपीएफच्या बसवर आत्मघाती हल्ल्याचा प्रयत्न झाला. पण हल्लेखोराच्या कारमध्ये स्फोट न झाल्याने मोठी दुर्घटना टळली होती.

महत्त्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वीच सुरक्षा दलातील जवानांच्या सुरक्षेसाठी सरकारने मोठं पाऊल उचलत जम्मू-काश्मीर-बारामुल्ला राष्ट्रीय महामार्गावर आठवड्यातून दोन दिवस सामान्य लोकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात विरोधी पक्षांनी आवाज उठवला आहे. हा निर्णय ३१ मे पर्यंत लागू असणार आहे. सामान्य नागरिकांसाठी रविवार आणि बुधवार असे दोन दिवस वाहतूक बंद असणार आहे.

याचवर्षी १४ फेब्रुवारी रोजी जम्मू-श्रीनगर महामार्गावर पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर दहशतवादी हल्ला केला होता. स्फोटकांनी भरलेली कार सीआऱपीएफच्या ताफ्यात नेत हा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते.

240 total views, 12 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा