टिकटॉकचे ‘६०’ लाखांहून अधिक व्हिडिओ हटवले…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  भारतात अगदी कमी वेळात लोकप्रिय झालेल्या टिकटॉक या चायनीज अॅप कंपनीकडून भारतातील ६० लाखहून अधिक टिकटॉक व्हिडिओ हटवण्यात आले आहेत. गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून आतापर्यंत टिकटॉक अॅपच्या नियमांचे मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करण्यात आलेले सर्व व्हिडिओ हटवण्यात आले असल्याचे कंपनीने सांगितले आहे. तर टिकटॉक अॅपचा वापर करणाऱ्यांना योग्य स्रोत देऊन त्यांना सशक्त करण्याचा प्रयत्न असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले. 

टिकटॉक अॅपचा वापर केवळ १३ वर्षांवरील मुलेच करू शकतात. ही एक अतिरिक्त सुरक्षा ठेवण्यात आली आहे. जेणेकरुन १३ वर्षांखालील मुले या अॅपचा वापर करू शकणार नाहीत. जागतिक पातळीवरील टिकटॉकची सुरक्षितता ही प्राथमिकता आहे. यामुळे आम्ही आमच्या भारतातील वापरकर्त्यांसाठी आमचं अॅप सुरक्षित आणि सकारात्मक ठेवण्यासाठी प्रयत्न करणार’ असल्याचे टिकटॉकचे संचालक हेलेना लेरच यांनी सांगितले. 

438 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram