Breaking News

 

 

टोप परिसरात गारांसह वादळी पाऊस : पिकांचे नुकसान

टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील नागाव, शिरोली, एमआयडीसी, टोप परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीठाच्या पावसाने दमदार हजेरी लावली. पण काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र दिसून आले.

आज (शनिवार) सायंकाळी परिसरात गारपिठासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने वातावरणातील उष्मा कमी झाला. या पावसाच्या सरीमुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले खरे पण कापणीला आलेला शाळूचे या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. टोप येथील शिये फाट्यामागील खणिच्या दिशेला पाऊस येण्या अगोदरच चक्री वादळासारखे मोठे वादळ आल्याने परिसरात कचरा या वादळासोबत हवेत उडू लागला. यामुळे संपूर्ण परिसरात धुरळा उडाला होता.

156 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे