Breaking News

 

 

महाडिकांचा तंबू युतीचे कार्यकर्ते उखडून टाकतील : महेश जाधव

गारगोटी (प्रतिनिधी) :  महाडिक ज्या तंबूत जाईल, तो तंबू फाडून टाकल्याशिवाय रहात नाही अशी त्यांची ख्याती आहे. पण या लोकसभा  निवडणूकीत महाडिकांचा तंबूच भाजपा, शिवसेना युतीचे कार्यकर्ते उखडून

टाकतील, असा टोला प. म. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी लगावला. ते प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कडगांव (ता.भुदरगड) मतदार संघातील प्रमूख कार्यकर्त्यांच्या  बैठकीत बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजीराव देसाई होते.

यावेळी जाधव म्हणाले, या देशात गेल्या साठ वर्षात जितक्या योजना आल्या नाहीत, त्यापेक्षा कैक पटीने अधिक योजना मोदी सरकारच्या काळात आल्या. या देशाचे भवितव्य उज्वल होण्यासाठी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक आहे. यासाठी महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलीक यांना निवडून देण्यासाठी भुदरगड तालुक्यातून प्रचंड मताधिक्य देवूया, असे आवाहन केले.

यावेळी भाजपा भुदरगड तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील, अलकेश कांदळकर, योगेश परुळेकर, संतोष पाटील, अनंत डोंगरकर, जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा, प्रविण सावंत, योगेश परुळेकर, संतोष पाटील,पं.स.सदस्य आक्काताई नलवडे,विलास बेलेकर,के.बी.देसाई,प्रवीण नलवडे यांच्यासहीत मान्यवर उपस्थित होते.

1,065 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash