Breaking News

 

 

चार्टर्ड अकौंटंटकडे प्रचंड कार्यक्षमता असते – सुरेश प्रभू


कोल्हापूर (प्रतिनिधी) : चार्टर्ड अकौंटंटकडे प्रचंड कार्यक्षमता असते. या कार्यक्षमतेमुळे व्यक्ती अनेक प्रकारच्या जबाबदार्‍या एकाच वेळी सक्षमपणे हाताळू शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य, उद्योग व नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी केले. ते आज (शनिवार) ‘सीए’ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया च्या कोल्हापूर शाखेतर्फे कोल्हापुरातील चार्टर्ड अकौंटंटसाठी आयोजित विशेष मार्गदर्शन शिबिरामध्ये बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी होते.

प्रभु म्हणाले की, चार्टर्ड अकौंटंट ही एक महत्त्वाची जबाबदारी असून प्रचंड कार्यक्षमता व बुध्दिमत्ता असल्याशिवाय सीए होता येत नाही. म्हणूनच मला सीए असल्याचा अभिमान आहे, कारण या पेशामुळेच मी अनेक जबाबदार्‍या सहजपणे पार पाडत आहे.

कोल्हापूर शाखाध्यक्ष सीए अमित शिंदे यांनी सुरेश प्रभू व ललित गांधी यांचा शाल, श्रीफळ व महालक्ष्मीची मूर्ती देऊन सन्मान केला. ललित गांधी म्हणाले की, सुरेश प्रभूंमुळेमुळे कोल्हापूर-कोकण रेल्वेला जोडण्याचे काम सुरू झाले तसेच कोल्हापूर विमानसेवा सुरू होऊन विमानतळ विस्तारीकरणाचे काम ही सुरू झाले आहे. देशात प्रथमच छोट्या व्यापार्‍यांसाठी केंद्र सरकारने स्वतंत्र विभाग करून उद्योग मंत्रालयाशी जोडला आहे. सुरेश प्रभूंचे योगदान कोल्हापूर व महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरले आहे.

चेतन ओसवाल यांनी प्रास्ताविक, तुषार अंतूरकर यांनी स्वागत केले. उद्योजक सुरेंद्र जैन, मकरंद देशपांडे, अनिल पाटील, सुबोध देशपांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

312 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे