हरळीनजीक कार झाडावर आदळली : आई, मुलगा जागीच ठार

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :  आईच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांना  घेऊन जात असताना कारवरील ताबा सुटल्याने रस्त्याकडेच्या झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेसह मुलाचा मृत्यू झाला असून इतर चारजण जखमी झाले आहेत. वासंती मारुती नांदवडेकर (वय ३५, रा. नेसरीतर्फ सावतवाडी, सध्या रा. पुणे), सोहम मारुती नांदवडेकर अशी त्यांची नावे आहेत. हा अपघात आज (शनिवार) पहाटे सव्वा पाचच्या दरम्यान हरळी (ता.गडहिंग्लज) येथील साखर कारखान्यापासून काही अंतरावर घडला.

कामानिमित्त पुणे येथे वास्तव्यास असणाऱ्या मारुती जोतिबा नांदवडेकर यांच्या आईंच्या निधनाची बातमी समजल्यावर ते आपल्या अल्टो कारमधून क्रमांक (एमएच १४ एफएक्स ३४५८) नेसरीला जात होते. कारमध्ये सोहम मारुती नांदवडेकर, सुप्रिया सुनिल भोसले, ओंकार भोसले, अलका मोतिराम सावंत, दिशा मोतिराम सावंत, मोतिराम सावंत, वासंती नांदवडेकर हे होते. आज पहाटे सव्वा पाचच्या सुमारास हरळी गावानजीक कारवरील ताबा सुटल्याने कारने रस्त्याच्या कडेला असणाऱ्या निलगीरीच्या झाडाला जोरदार धडक दिली.

या अपघातात वासंती नांदवडेकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतरजण जखमी झाले. जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर सोहमचा कोल्हापूरात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या अपघाताची नोंद गडहिंग्लज पोलीस ठाण्यात झाली आहे.

6,405 total views, 30 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram