Breaking News

 

 

‘दुसऱ्याच्या लग्नात नाचतंय खुळं…’ : मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंवर टीका

नांदेड (प्रतिनिधी) : अशोक चव्हाणांनी प्रचारासाठी नेताही भाडोत्री आणला. भाडोत्री नेता आणून अशोक चव्हाण समर्थन मागत आहेत. स्वत:चा पक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचा नाही, मात्र आमच्याविरुद्ध सभा घ्यायच्या हे म्हणजे ‘दुसऱ्याच्या लग्नात नाचतंय खुळं’ असा प्रकार आहे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण आणि राज ठाकरेंवर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी शुक्रवारी नांदेडमध्ये झालेल्या सभेत मुख्यमंत्री आणि मोदींवर टीका केली. नांदेडच्या भोकरमध्ये युतीचे उमेदवार प्रताप चिखलीकर यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

महाराष्ट्राचं पाणी गुजरातला देण्याचा आरोप राज ठाकरे माझ्यावर करत आहेत. मात्र यासंदर्भातला करार अशोक चव्हाणांनी केला होता आणि मी तो रद्द केला असं म्हणत या टीकेलाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे. अशोकराव तुम्ही सत्तेत होतात तेव्हा तु्म्ही नांदेडला किती पैसे दिलेत सांगा? आम्ही २ हजार २२६ कोटी थेट शेतकऱ्यांना दिले हे तुम्ही कसं विसरता? असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे हे आम्ही जाणतो, त्याचमुळे मोदींनी एक घोषणा केली आहे की शेतकरी साठ वर्षांचा झाला की त्यालाही पेन्शन देण्यात येईल. जगात शेतकऱ्यांना पेन्शन देणारं भारत हे पहिलं राष्ट्र ठरलं आहे. गरिबी हटावचा नारा राहुल गांधी देत आहेत. इतक्या वर्षांनी ही घोषणा देताना लाज कशी वाटत नाही? असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधीवरही निशाणा साधला आहे. राज ठाकरेंचा उल्लेख त्यांनी भाडोत्री नेता असा केला आहे.

2,321 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे