Breaking News

 

 

राहुल गांधींचा फोन आला अन् ‘ते’ पक्षातच राहिले…

नगर (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत किंवा तत्पूर्वी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे जवळपास ठरले असताना काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या फोनमुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेंचा भाजप प्रवेश लांबणीवर पडल्याची चर्चा नगर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पुत्र डॉ. सुजयने भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्याच्या पाठोपाठ राधाकृष्ण विखेही भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात होते. भाजप प्रवेश करताना काँग्रेसचे काही आमदारही ते समवेत आणणार असल्याचीही चर्चा होती. या पार्श्वभूमीवर डॉ. सुजय यांच्यासाठी नगरला होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेतच विखेंचा भाजप प्रवेश होण्याची जोरदार चर्चा होती. तसा निर्णयही झाल्याचे सांगण्यात येत होते. पण अखेर हा प्रवेश शुक्रवारी झाला नाही. विखे समर्थकांकडूनच, ‘राहुल गांधींच्या फोनमुळे आमचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला,’ असे खासगीत स्पष्ट केले गेले. ‘तुमच्या भावना समजतात, तुमच्यावर अन्याय झाल्याचेही जाणवते, पण थोडे थांबा,’ असे राहुल गांधी विखेंना म्हणाल्याचेही सांगितले जाते. त्यामुळेच विखेंनी भाजप प्रवेश ऐनवेळी रद्द झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची नगरची सभा निश्चित झाल्यावर या सभेच्या नियोजनात विखेंनी सक्रिय सहभाग घेतला होता. युतीच्या समन्वय बैठकीसही ते उपस्थित होते. पण शुक्रवारी सभेच्या दिवशी ते दिवसभर गायब होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या स्वागतालाही ते गेले नव्हते. सभास्थानीही फिरकले नाहीत. एका समर्थकाच्या घरी टीव्हीवर त्यांनी मोदींची सभा पाहिली असल्याचे वृत्त आहे.

1,155 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा