Breaking News

 

 

मोदी कालखंडात लोकशाहीच्या स्तंभांवर आघात : शरद पवार

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  मोदी कालखंडात देशाच्या लोकशाहीच्या स्तंभावर आघात होत आहेत. न्याय व्यवस्था, लीड बँक, लष्कर आणि वृत्तपत्र स्वातंत्र्यामध्ये मोदी सरकारने वारंवार हस्तक्षेप केला आहे. हे संसदीय लोकशाहीत आणि संविधानाला घात आहे. देश पातळीवर विकासाच्या दृष्टीने दिलेली आश्वासनांची अंमलबजावणी केली नसल्यामुळे आता जनतेच्या मनात बदल घडवण्याची मानसिकता दिसून येत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत केले.

शरद पवार म्हणाले, देश पातळीवर मोदी सरकारने काश्मीरमधील 370 कलम, राफेल प्रकरण याबाबत जनतेची दिशाभूल केली. काश्मिरमध्ये मेहबूबा मुक्ती यांच्या नॅशनल कॉन्फरन्स पक्षाबरोबर भाजपाची आघाडी ती विकासाच्या मु्द्द्यावर तुटली. राफेल प्रकरणात तीनवेळा वेगवेगळ्या किंमती सांगून संभ्रम निर्माण केला. खरा वृ्त्तांत द हिंदू दैनिकात आल्यानंतर त्यांच्यावर कारवाईचा इशारा दिला. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधिशांनी सरकार कामकाजात हस्तक्षेप करीत असल्याचे पत्रकार परिषद घेवून सांगितले.

रिझर्व्ह बँकेचे गुजरातचे असलेले गव्हर्नर उर्जित पटेल यांनी सहा महिन्यात राजीनामा दिला. त्याचे कारण त्यांच्या निकटवर्तीयांनी सरकारचा हस्तक्षेप हेच असल्याचे सांगितले. पुलवामा नंतर लष्करांनी केलेल्या कारवाईला मोदी सेना संबोधने व लष्कराचे शौर्य आपलेच असल्याचे भासवले. असा प्रकार यापूर्वी कोणत्याच पक्षाने किंवा पंतप्रधानांनी केला नव्हता तो मोदींनी केला.

हिंदुत्वाचे कार्ड चालले नाही, विकासाचे मुद्दे मागे पडले म्हणून मोदी यांनी लष्कराच्या शौर्याचा आपल्या फायद्यासाठी वापर करुन घेतला. पण जनतेला आता हे समजले आहे. या निवडणूकीतील पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानामुळे लोकांची देशात बदल घडवण्याची मानसिकता दिसून आली आहे. काँग्रेसच्या देशद्रोही बाबतच्या कायद्यात बदल करण्याच्या जाहीरनाम्यातील भूमिकेमध्ये या कायद्याचा कोणी गैरवापर करु नये, यासाठी काही मुद्दे बदलणे असं असल्याचे पवार यांनी स्पष्ट होते.  

285 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे