Breaking News

 

 

पालिकेची प्लॅस्टिक कॅरीबॅग विरोधात मोहीम सुरुच : ५० हजारांचा दंड वसूल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्लॅस्टिक कॅरीबॅग प्रतिबंधात्मक पथकाद्वारे शहरामध्ये प्लॅस्टिक पिशव्या व नॉन वोव्हेन पिशव्या उत्पादन, साठा व विक्री करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईची धडक मोहीम राबविण्यात येत आहे.

आज (शुक्रवार) शहरातील न्यू शाहूपूरी, कावळानाका व महाद्वार रोड परिसरातील हॉटचिप्स, केदारलिंग बेकरी, राजपुरोहित, जे. हॉटेल, नक्षत्र वेअर, शिव मेन्सवेअर परिसर यांच्याकडील प्लॅस्टिक पिशव्या व नॉन वोव्हेन पिशव्या विक्री, साठा केलेचे निदर्शनास आले. त्यांचेकडून 30 किलो प्लॅस्टिक व नॉन वोव्हेन पिशव्या जप्त करुन ५० हजारांचा दंड वसूल केला.

या नॉन वोव्हेन पिशव्या कापडी पिशव्या सारखे दिसत असून सदरच्या पिशव्या या प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत. तरी शहरातील नागरीकांनी व व्यापारांनी कापडी पिशवी घेतेवेळी त्याची योग्य पडताळणी करुनच घ्यावी. तसेच प्लॅस्टिक मेटरियल आढळून आल्यास त्यांच्यावर जप्तीची व दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

ही कारवाई आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ.विजय पाटील, विभागीय आरोग्य निरिक्षक निखिल पाडळकर, जयवंत पवार, आरोग्य निरिक्षक शुभांगी पोवार आणि कर्मचाऱ्यांनी केली.

669 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश