टोप येथे नागरीकांच्या सतर्कतेमुळे एटीएम फोडण्याचा प्रयत्न पुन्हा असफल…

टोप (प्रतिनिधी)  : टोप (ता. हातकणंगले) येथील एटीएम मशीनवर दहा दिवसांपूर्वी चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला होता. पण नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा हा प्रयत्न असफल झाला होता. काल (गुरूवार) रात्री दिडच्या सुमारास हे एटीएम मशीन परत फोडण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्नही नागरिकांच्या सतर्कतेमुळेच अयशस्वी झाला. बँकेने भविष्यात यासारखा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षारक्षक नेमणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

टोप (ता. हातकणंगले) येथे काल रात्री दिडच्या सुमारास गावातील लाईट घालवुन चोरट्यांनी पुन्हा एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करीत होते.  इंडिया बँकेच्या एटीएम मशीनच्या जवळच दोघे चोरटे हातात पार तसेच लोखंडी गज घेवुन जात असताना टोप येथील ग्रा.पं. सदस्य राजू कोळी आणि मिलिंद कुशिरे यांच्या निदर्शनास आले. हे दोघेही बाहेरगावी गेले होते. ते रात्री दिडच्या सुमारास गावात आले. गावातील लाईट गेल्याने त्यानी मोबाईलाचा टॉर्च लावून घरी जात होते. त्यावेळी या दोघांना एटीएम मशीनच्या जवळ दोघे चोरटे हातामध्ये लोखंडी गज, कटावनी घेवून एटीएम मशीनच्या जवळ दिसले.

परंतु या दोघांनी त्या चोरट्यांजवळ जवळ जाण्याचा प्रयत्न केला नाही कारण मागच्या चोरीच्या प्रयत्नात चोरट्यांनी नागरिकांच्यावर दगड फेक करून मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यानी तेथुन लांब जावून गावातील तरुणांना व पोलिस स्टेशन फोनवरुन या बाबतची माहिती दिली. काही वेळातच गावातील काही तरुण व पोलिस घटनेच्या ठिकाणी आले. यामुळे चोरट्यांनी तेथुन धूम ठोकली.

काही तरुण त्यांच्या मागावर गेले असता एक लाल रंगाची टू व्हीलर गाडी होती. त्या गाडीला कुदळ बांधल्या होत्या. त्या गाडीचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न नागरीकांनी केला. पण चोरट्यांनी महाडिक काँलनीच्या दिशेने जात गाडीचा वेग आणि दिशा अचानक बदलून पसार झाले. यामुळे परिसरात भितीचे वातवरण पसरले असुन नागरिकांच्या सतर्कतेमुळे पुन्हा एकदा हा चोरीचा प्रयत्न फसला.

या घटनेची माहिती शिरोली पोलिसाना समजताच घटनास्थळी धाव घेवून घटनेची पाहणी केली.

318 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram