Breaking News

 

 

कोल्हापुरात उद्या आदित्य ठाकरे साधणार युवकांशी ‘संवाद..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवसेना नेते व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे शनिवार दि. १३ रोजी कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. शनिवार सायंकाळी ५ वा. न्यू महाद्वार रस्त्यावरील पेटाळा मैदानावर ते ‘आदित्य संवाद’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोल्हापूरच्या युवक-युवतींशी थेट संवाद साधणार आहेत. या माध्यमातून युवकांच्या समस्या व विचारासाठी हे व्यासपीठ उपलब्ध असणार आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्यात आदित्य ठाकरे हे डिजिटल माध्यमातून किमान १५ लाख युवकांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती युवा सेना, मुंबईचे पवन जाधव आणि साईनाथ दुर्गे यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत दिली.


ते म्हणाले की, महाराष्ट्रातील युवा वर्गाच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी सदरचा कार्यक्रम १८ ते ३५ वयोगटातील युवा वर्गासाठी खुला आहे. युवक – युवती www.aditysanvad.com या संकेतस्थळावर नोंदणी करुन कार्यक्रमास उपस्थित राहू शकतात. विविध क्षेत्रातील युव युवतींनाही सहभागी होता येणार आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नोंदणी झाली आहे. युवा सेनेने जिल्ह्यातील बारा तालुक्यातील विविध महाविद्यालयात जाऊन या ‘आदित्य संवाद’ कार्यक्रमासाठी युवकांची नोंद केली आहे. आजअखेर ६० हजार युवक युवतींची आँनलाईन सोशल मिडीया आणि प्रत्यक्ष नोंदणी पूर्ण झाली आहे.

या वेळी कोल्हापूर जिल्हा युवा सेनेचे हर्षल सुर्वे, मनजित माने, संदीप पाटील, चैतन्य अष्टेकर उपस्थित होते.

546 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे