Breaking News

 

 

भर सभेत ‘गांधीं’ना भाषणापासून रोखले अन्…

नगर (प्रतिनिधी) : नगर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे – पाटील यांच्या प्रचारार्थ आज (शुक्रवार) नगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजीत करण्यात आली होती. भाषण करताना विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना जिल्हाध्यक्ष बेरड यांनी रोखल्याने गांधी यांचा संताप अनावर झाला. त्यांनी व्यासपीठावरच आपला संताप व्यक्त केला. भर सभेत हा प्रकार घडल्याने नगर जिल्ह्यातील भाजपमधील मतभेद समोर आल्याची चर्चा रंगली होती.

सुजय विखेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची अहमदनगरमध्ये सभा घेण्यात आली. मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे व्यासपीठावर आगमन होण्यापूर्वी राज्यातील, तसेच स्थानिक नेत्यांची भाषणं झाली. खासदार दिलीप गांधी हे व्यासपीठावर भाषण करण्यासाठी आले. ते भाषणातून विकासकामांबद्दल जनतेला माहिती देत होते. त्याचवेळी जिल्हाध्यक्ष बेरड यांनी त्यांना अर्ध्यावरच भाषण थांबवायला सांगितलं. त्यावर दिलीप गांधी हे खूपच संतापले.  चिडले. मला किमान दोन मिनिटे तरी बोलू द्या. मी विकास केला नाही, असं म्हटलं जातं. पण मी केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा सोबत घेऊन आलो आहे. यात सगळं काही आहे, असं म्हणत त्यांनी भाषण सुरूच ठेवलं. बोलताना त्यांचे डोळे पाणावले होते.

व्यासपीठावरील माइक मिनिटभरासाठी बंद होता. गांधींनी सुनावल्यानंतर बेरड व्यासपीठावरून बाजूला गेले. त्यानंतर गांधी यांनी भाषण केलं. त्यात त्यांनी केलेल्या विकासकामांची माहिती दिली. भरसभेत मतदारांसमोर हा प्रकार घडल्यानं जिल्ह्यातील पक्षांतर्गत मतभेद समोर आल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

2,391 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *