Breaking News

 

 

राधाकृष्ण विखे – पाटील यांचा भाजपला चकवा ?

नगर (प्रतिनिधी) : शिवसेना-भाजप-रिपाइं युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आज (शुक्रवार) नगरमध्ये पार पडली. या सभेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा होती. विखे-पाटील हे खुलेआम भाजपच्या बैठकांना उपस्थिती लावत असल्यानं या चर्चेला हवा मिळाली होती. मात्र, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या सभेला हजर न राहता भाजपच्या नेत्यांना चकवा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला त्यांचे चिरंजीव आणि नगरचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी पूर्णविराम दिला. ‘राधाकृष्ण विखे-पाटील हे काँग्रेसमध्ये राहणार आहेत. ते भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत. काँग्रेसवर ते नाराज नाहीत. त्यांचे मतभेद राष्ट्रवादी काँग्रेसशी आहेत,’ असं सुजय यांनी स्पष्ट केलं. राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचं आज स्पष्ट झाल्यानं नगरमध्ये संभ्रम अधिक वाढला आहे. विखे सध्या काँग्रेसमध्ये असले तरी भाजपचा उमेदवार असलेल्या मुलाचा उघड प्रचार करत आहेत. त्यामुळं राष्ट्रवादीनं काँग्रेसकडं तक्रार केली आहे. आता काँग्रेस नेमकी काय भूमिका घेते, याकडं आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

1,558 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

 

क्रीडा