Breaking News

 

 

जेट एअरवेजच्या विमानांची उड्डाणे रोखली : प्रवाशांचा खोळंबा

मुंबई (प्रतिनिधी) : तांत्रिक बाबींवरुन जेट एअरवेजच्या विमानांची उड्डाणे डायरेक्टोरेट जनरल ऑफ कमर्शियल इंटेलिजेंस अॅण्ड स्टॅटिस्टिक्सने (डीजीसीआय) रोखली आहेत. त्यामुळे काल (गुरुवार) रात्रीपासून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे.

जेट एअरवेज ही विमान कंपनी गेल्या काही दिवसांपासून आर्थिक चणचणीच्या गर्तेत अडकली आहे. त्यामुळे कंपनीला डीजीसीआयने तांत्रिक मुद्द्यांवरुन विमान उड्डाणाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे काल रात्रीपासून जेटची आंतरराष्ट्रीय विमान सेवा ठप्प झाली आहे. त्यातच उड्डाणांबाबत जेटच्या प्रतिनिधींकडून समाधानकारक उत्तरे दिली जात नसल्याने प्रवासी वैतागले आहेत.

दरम्यान, या प्रकरणाची दखल केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी घेतली आहे.  यासंदर्भात ट्विट करुन त्यांनी या प्रश्नाचा आढावा घेण्याच्या सूचना नागरी वाहतूक मंत्रालयाच्या सचिवांना दिल्या आहेत. प्रवाशांच्या अडचणी कमी करण्याच्या आणि त्यांच्या सुरक्षेबाबत आवश्यक पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्याचे, प्रभू यांनी म्हटले आहे.

147 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे