सैन्याच्या शौर्याच्या राजकीय वापरामुळे माजी सैनिक संतापले..! :

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय सैन्याने केलेल्या लष्करी कारवायांचा राजकीय वापर होत असल्याने काही माजी सैनिक भडकले आहेत. यासंदर्भात त्यांनी थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून सैन्याच्या कामगिरीचे श्रेय राजकीय पक्षांनी घेऊ नये, असे आदेश त्यांना देण्यात यावेत, अशी विनंती केली आहे. हे पत्र लिहिणाऱ्या १५६ माजी सैनिकांमध्ये माजी लष्करप्रमुख दीपक कपूर, देशाच्या तिन्ही दलांच्या ८ माजी प्रमुखांच्या सह्या आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपाने सैन्याच्या कामगिरीवरुन मते मागण्याचा प्रयत्न अनेकदा केला आहे. हेच या अधिकाऱ्यांना खटकले आहे, त्यामुळे त्यांनी थेट राष्ट्रपतींकडे धाव घेतली आहे. बालाकोट हल्ल्यावेळी पाकिस्तानच्या तावडीतून सुटका होऊन देशात परतलेल्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे छायाचित्र काही जणांनी फ्लेक्सवर लावले होते. त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारतीय सैन्याचा उल्लेख मोदींची सेना असा केला होता.

लातूर जिल्ह्यातील औसा येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवमतदारांना आवाहन करताना पुलवामातील शहीदांची, पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये हवाई हल्ला करणाऱ्या जवानांची आठवण ठेवताना, त्यांच्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले होते. इतकेच नव्हे त्यांच्यासाठी मत देताना ते कमळाच्या बटण दाबून द्यावे म्हणजे तुमचे मत मोदींना जाईन असे उघडपणे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानावर विरोधकांनी आक्षेप घेतला असून निवडणूक आयोगाकडे तक्रारही देण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने याकडे दुर्लक्ष केल्याने आता माजी लष्करी अधिकाऱ्यांना थेट राष्ट्रपतींकडेच धाव घेणे भाग पडले आहे.

450 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram