कुंभोज (प्रतिनिधी) : येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या सात मित्रांची साई समर्थ तरुण मंडळाच्या गणेशाची प्रतिष्ठापना मंडळाचे माजी अध्यक्ष व सदस्य इनुस मुनीर सुतार परिवाराच्या वतीने करण्यात आली. गेल्या दहा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या तरुण मंडळांतर्फे मुस्लिम बांधव गणेशोत्सव उत्साहाने साजरा करतात.

गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाचे अध्यक्ष तुषार शिंगे, इनुस सुतार यांच्या माध्यमातून अनेक मुलांनी एकत्र येऊन हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असणाऱ्या साथ मित्रांची तरुण मंडळाची स्थापना केली. दररोज गणेशमूर्तीची पूजा व आरतीचा मान मुस्लिम समाजातील परिवारालाच आहे. यामध्ये ते सहकुटुंब उत्साहाने सहभागी होतात. या तरुण मंडळामध्ये किरण पाटील, इनुस सुतार, सादिक सुतार, नीलेश शिंगे, तुषार शिंगे, मोहसीन सुतार, फारुख सुतार,अजित माने, स्वागत पाटील, सज्जाद सुतार, अरमान सुतार, राहुल शिंगे आदी कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

अजिंक्य तरुण मंडळ

कुंभोज येथील अजिंक्य तरुण मंडळाच्या गणेशमूर्तीचे उत्साहात आगमन झाले. त्यानंतर विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. मंडळाने गणेशोत्सव कालावधीमध्ये परिसरात वृक्षारोपण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. मंडळांने आजपर्यंत अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात कार्य उल्लेखनीय केले आहे. कोरोना काळातही मंडळाने मदतकार्य केले आहे. गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मंडळाकडून मदत केली जाते. मंडळाचे अनिल अकिवाटे, उपसरपंच अनिकेत चौगुले, सागर अकिवाटे, वर्धमान पाटील, अशोक चौगुले, स्वप्नील अकिवाटे, दिनेश पाटील, निरंजन भरमगुडे, अंकुश खोत, सूरज पाटील, प्रवीण चौगुले, आदित्य चौगुले, स्वप्नील चौगुले, सूरज चौगुले आदी कार्यकर्ते विविध उपक्रमात सक्रिय असतात.