Breaking News

 

 

लोकसभा निवडणूक : राज्यात ६२ टक्के, तर बंगाल, सिक्कीममध्ये सर्वाधिक मतदान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये १८ राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील ९१  जागांसाठीचे मतदान आज (गुरुवार) पार पडले. सर्वाधिक मतदान त्रिपुरा (81.8 टक्के) आणि प. बंगालमध्ये (81 टक्के) झाले आहे. किरकोळ घटना वगळता सर्व ठिकाणी मतदान शांततेत पार पाडण्यात यश आले आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाचे उपायुक्त उमेश सिन्हा यांनी पत्रकार परिषदेमध्ये  दिली.

सिन्हा यांनी सांगितले की, नक्षलप्रभावित दंतेवाडामध्ये आणि बस्तर मतदारसंघात कोणतीही गडबड होऊ नये म्हणून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्या भागातही भयमुक्त वातावरणात मतदान पार पडलं असून देशातील ९१ लोकसभा मतदारसंघात १.७ लाख मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचंही त्यांनी सांगितलं. देशभरात ६.८७ कोटी महिला आणि १४ लाख दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, असल्याचं त्यांनी सांगितलं. 

विविध राज्यांमध्ये झालेल्या मतदानाची आकडेवारी

महाराष्ट्र (६२ टक्के), सिक्किम – 69 टक्के, मिझोराम – 60 टक्के, नागालँड – 78 टक्के, मनिपूर – 78.2 टक्के, त्रिपुरा – 81.8 टक्के, आसाम – 68 टक्के, प. बंगाल – 81 टक्के, अंदमान आणि निकोबार – 70.67 टक्के, आंध्र प्रदेश – 66 टक्के, छत्तीसगड – 56 टक्के, तेलंगणा – 60 टक्के, उत्तराखंड – 57.85 टक्के, जम्मू-कश्मीर – 54.49 टक्के (अंतिम आकडा वाढू शकतो).

432 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash