कोल्हापुरात पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांविरोधात रावसाहेब दानवेंकडे तक्रार : संदीप देसाई

0 1

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक आहेत. युतीच्या उमेदवाराचा प्रचार सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते दिवस करत आहेत. परंतु काही पदाधिकारी व कार्यकर्ते हे विरोधी राष्ट्रवादी पक्षाचा प्रचार करत आहेत. या कार्यकर्त्यांची प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार करून त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली असल्याची माहिती भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

देसाई यांनी पत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्यामध्ये पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, प. महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी अतिशय कष्टाने पक्ष वाढवला आहे. अशा वेळेला पक्षविरोधी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षामध्ये स्थान देणे अयोग्य ठरत आहे. या कार्यकर्त्यांच्या बाबतीत अनेक लेखी तक्रारी देखील प्राप्त झाल्या. यावर वरिष्ठ स्तरावर पक्षाची कोअर कमिटीची बैठक बुधवारी पक्ष कार्यालयात झाली. यामध्ये राजारामपुरी भाजपा मंडल अध्यक्ष जयराज निंबाळकर (रा. राजारामपुरी १० वी गल्ली),  उत्तरेश्वर पेठ भाजपा मंडल अध्यक्ष सतीश पाटील-घरपणकर (रा.१४७२ उत्तरेश्वर पेठ). महानगर चिटणीस राजू मोरे (रा. फुलेवाडी ६ वा बसस्टॉप) सदस्य गणेश खाडे (रा. लक्षतीर्थ वसाहत), शिवप्रसाद घोडके (रा. जरगनगर) पक्षातून हकालपट्टी करण्यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील यांचेकडे तक्रार पाठवली आहे. अजून काही पदाधिकारी पक्ष विरोधी कारवाया करत असतील तर त्यांचीही हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.  

या निर्णय प्रक्रीयेमध्ये प्रामुख्याने महेश जाधव, संदीप देसाई, उपाध्यक्ष राहुल चिकोडे, सरचिटणीस – विजय जाधव, अशोक देसाई, संतोष भिवटे, सुभाष रामुगडे, दिलीप मेत्राणी, अॅड.संपतराव पवार, आर. डी. पाटील, मारुती भागोजी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More