…अखेर ‘विकिलिक्स’चा संस्थापक ज्युलियन असांजला अटक !

लंडन (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय गुप्ततेच्या कायद्याचा भंग करून अनेक देशांची गुप्त माहिती, कागदपत्रे, संभाषणे सार्वजनिक केल्याप्रकरणी अखेर विकिलिक्स संस्थापक ज्युलियन असांजला अटक करण्यात आली आहे. लंडन पोलिसांनी इक्वेडोरच्या लंडन येथील दूतावासातून त्याला ताब्यात घेतले.

आंतरराष्ट्रीय गुप्ततेच्या कायद्याचा भंग करून विविध देशांची, राजकारण्याची माहिती, कागदपत्रे, संभाषण असांजने जाहीर केले होते. त्यामुळे त्याला अटक व्हावी यासाठी अनेक देश प्रयत्न करीत होते. आपली अटक टळावी या उद्देशाने इक्वेडोरच्या लंडन येथील दूतावासात वास्तव्य करत होता. आंतरराष्ट्रीय दबावामुळे अखेर इक्वेडोरने त्याला या पुढील काळात आश्रय देण्यास नकार दिला. त्यानंतर लंडन पोलिसांनी त्याला अटक केली.

त्याला वेस्टमिनिस्टर कोर्टापुढे हजर करण्यात येईल असे पोलिसांनी म्हटले आहे. असांजने २०१० मध्ये अनेक गोपनीय कागदपत्रे सार्वजनिक केली होती. आपली अटक टळावी म्हणून तो २०१२ पासून इक्वेडोरच्या दूतावासात वास्तव्य करत होता. १२ डिसेंबर २०१८ ला त्याला इक्वेडोरचे नागरिकत्व मिळाले होते.

216 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram