नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आई पाओला माईनो यांचे शनिवार, दि. २७ ऑगस्ट रोजी इटलीतील त्यांच्या घरी निधन झाले. त्यांच्यावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्वीट करत दिली आहे.

गेल्या २४ ऑगस्ट रोजी काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सोनिया गांधी त्यांचा मुलगा राहुल गांधी आणि मुलगी प्रियांका गांधी यांच्यासोबत परदेश दौऱ्यावर जाणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच नवी दिल्लीत परतण्यापूर्वी सोनिया त्यांच्या आजारी आईचीही भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले होते.