Breaking News

 

 

कोल्हापूरच्या विकासात, सामाजिक कार्यात क्रिडाईचे योगदान : विद्यानंद बेडेकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  क्रिडाई कोल्हापूरने सुरुवातीपासूनच सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्याचबरोबर कोल्हापूरच्या विकासात क्रिडाईचे महत्वाचे योगदान आहे. आता बांधकाम क्षेत्रात महिलाही येवू लागल्या आहेत. म्हणून महिलांसाठी क्रिडाईमध्ये स्वंतत्र विभाग सुरु कऱणार असल्याचे, प्रतिपादन क्रिडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी केले. ते क्रिडाईच्या नूतन कार्यकारणीच्या पदग्रहण समारंभात अध्यक्षपदाची सुत्रे घेताना बोलत होते.

क्रिडाई कोल्हापूरच्या नूतन कार्यकारणीचा पदग्रहण समारंभ क्रिडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष राजीव पारीख यांच्या अध्यक्षतेखाली आणि जेष्ठ सदस्य व्ही.बी.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, सचिव रविकिशोर माने, खजानिस सचिन ओसवाल, सहसचिव विक्रांत जाधव, गौतम परमार, सहखजानिस प्रदिप भारमल, संचालक श्रीधर कुलकर्णी, श्रेयांस मगदूम, प्रमोद साळुंखे, निखिल शहा, सागर नालंग, राजेश आडके, चेतन चव्हाण, शिवाजी संकपाळ, गणेश सावंत आणि अद्वैत दिक्षित या नूतन कार्यकारणीचा पदग्रहण समारंभ झाला.

त्यानंतर मावळते अध्यक्ष महेश यादव यांनी गेल्या चार वर्षाच्या आतल्या कार्यकारणीचा आढावा घेताना बांधकाम क्षेत्रातील महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक पातळीपासून मंत्रालयापर्यंत केलेले प्रयत्न आणि त्याला आलेले यश सांगून काही उर्वरीत प्रश्न नूतन कार्यकारणीने सोडवावे, त्यांना आपण सहकार्य करु. याबरोबरच सामाजिक उपक्रम व दालन प्रदर्शन हे आपल्या कारकिर्दीतील चांगले काम झाल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राजीव परीख आणि व्ही.बी. पाटील यांनी नूतन कार्यकारणीस शुभेच्छा दिल्या. क्रिडाई एकसंघ राहण्यासाठी सहकार्य करु असे सांगितले. नूतन कार्यकारणी बिनविरोध करण्यासाठी जेष्ठ सभासद कृष्णा पाटील, राजीव परीख यांनी विशेष प्रयत्न केल्याचे सचिव पी.के. खोत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा