Breaking News

 

 

कोल्हापूरच्या सातबारावर खा. धनंजय महाडिक यांचंच नाव कायम : प्रवीणसिंह पाटील

मुरगूड (प्रतिनिधी) : खा. धनंजय महाडिक यांनी आपल्या विकासकामांच्या बळावर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडली आहे. त्यामुळे त्यांचं नाव जिल्ह्याच्या सात-बारावर कायमचं कोरलं गेलं आहे, असे प्रतिपादन प्रवीणसिंह पाटील यांनी केले. मुरगूड (ता. कागल) येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

या मेळाव्याला आ. हसन मुश्रीफ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रा. जालंदर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. श्रीफ यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.  पाच वर्षे कुंभकर्णाप्रमाणे झोपलेले विरोधक  आता निवडणुकीच्या तोंडावर जागे झाले आहेत,  पण जनता त्यांना आता कायमची झोपवेल. अशी टीका त्यांनी केली.

प्रवीणसिंह पाटील यांनी यावेळी वारसाहक्कानं खासदार बनू पाहणाऱ्यांना इथं थारा नाही, असा टोला प्रवीणसिंह पाटील लगावला. या वेळी रणजीत सूर्यवंशी, शामराव पाटील, शामराव घाटगे, आर. व्ही. पाटील, एम. एस. पाटील, नारायण ढोले, तानाजीराव मगदूम, दिग्विजय पाटील, वसंतराव पाटील, शिवाजीराव पाटील, अर्जुन म्हसवेकर, प्रकाश पाटील, अरुण यमगेकर यांच्यासह मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

531 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे