अखेर विधानसभेचा विरोधी पक्षनेता मुलाच्या प्रचारासाठी भाजपच्या व्यासपीठावर…

0 1

नगर (प्रतिनिधी) : काँग्रेसने निवडणूक प्रचारात नाव आणि फोटो वापरण्यावर बंदी घातल्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे चिरंजीव सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. नगरचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारानिमित्त आयोजित भाजपच्या बैठकीला ते व्यासपीठावर दिसल्याने चर्चेला उधाण आले आहे. विखे पाटील यांनी अद्याप काँग्रेस पक्ष किंवा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेला नाही.

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी १२ एप्रिल रोजी नगरमध्ये भाजपची प्रचारसभा आयोजित केली आहे. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.

या सभेच्या निमित्ताने  राधाकृष्ण विखे-पाटील हे नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे शक्यता वर्तवली जात आहे. मात्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद तसेच काँग्रेस पक्षातील पदांवर असताना देखील भाजपच्या प्रचार बैठकीला हजेरी लावल्याने खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More