Breaking News

 

 

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना पितृशोक

पुणे (प्रतिनिधी) : ख्यातनाम लेखक गो. नी. दांडेकर यांचे जावई अन विख्यात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचे वडील प्रा. डॉ. विजय देव यांचे दीर्घ आजाराने आज (गुरुवार) सकाळी पुण्यात निधन झाले. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक अशी देव यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने पुण्यातील शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

देव यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पत्नी लेखिका डॉ. वीणा देव, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी व मधुरा या दोन कन्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

597 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा