Breaking News

 

 

अमळनेरमधील ‘लाथा-हातांची बात’ प्रकरण : उदय वाघ, बी. एस. पाटील यांच्याविरुद्ध गंभीर गुन्हे…

अमळनेर (प्रतिनिधी) : येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत काल (बुधवार) झालेल्या मेळाव्यात भाजप नेते, कार्यकर्त्यांत धुमश्चक्री झाली होती. माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांना मारहाण केल्याप्रकरणी भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ, शहराध्यक्षासह ७ कार्यकर्त्यांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे डॉ. पाटील यांच्याविरुद्ध अ‍ॅटॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत डॉ. पाटील यांनी म्हटले आहे की, वाघ यांनी तुझे घर उध्वस्त करून टाकू तुला जिवंत राहू देणार नाही… अशा शब्दात दमबाजी करत नाका-तोंडातून रक्त पडेपर्यंत लाथ बुक्क्यांनी मारहाण केली. त्याचवेळी भाजप शहराध्यक्ष शीतल देशमुख, राजेश वाघ, पंकज पवार, संदीप वाघ, देवा लांडगे, एजाज बागवान यांनी व्यासपीठावर येऊन मारहाण सुरू केली. त्या वेळी गिरीश महाजन, गुलाबराव पाटील व पोलिसांनी मला वाचवले. स्मिता वाघ यांची लोकसभेची उमेदवारी रद्द झाल्याचा राग मनात ठेवून त्यांनी हा प्रकार केला गेला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तपास एपीआय प्रकाश सदगीर करीत आहेत.

तर पंचायत समितीच्या सभापती वजाताई भिल यांनी रात्री उशिरा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, २० मार्च रोजी माजी आमदार डॉ. पाटील यांनी माझा पीए भूषण जैन याच्या भ्रमणध्वनीवर फोन करून सांगितले की खासदारकीची उमेदवारी मिळण्यासाठी समर्थन देण्यासाठी सभापतींना घेऊन ये. मात्र मी गेले नाही म्हणून त्यांनी १० रोजी प्रचारसभेत जातिवाचक शिवीगाळ केली. त्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला डॉ. पाटील यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास डीवायएसपी राजेंद्र ससाणे करीत आहेत. पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना डॉ. पाटील यांच्या पत्नी ह्या स्मिता वाघ यांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकारही काल रात्री घडला.

312 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा