Breaking News

 

 

‘साहेबां’च्या देशाला शंभर वर्षांनंतर सुचले शहाणपण : ‘जालियानवाला’ हत्याकांडाबद्दल मागितली माफी

लंडन (वृत्तसंस्था) : पंजाबमधील अमृतसर येथील जालियानवाला बागेत घडलेले हत्याकांड हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील काळे पान मानले जाते. या दुर्दैवी आणि घृणास्पद प्रकाराला शनिवार दि. १३ रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आज (बुधवार) ब्रिटिश संसदेत जाहीरपणे माफी मागितली. त्यांची ही कृती ऐतिहासिक मानली जात आहे.

थेरेसा मे यांनी संसदेत या हत्याकांडाबद्दल खेद व्यक्त करताना म्हटले की, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या घटनेबद्दल आम्हाला पश्चात्ताप वाटतो. त्यामध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनी भोगलेले दु:ख अपरंपार आहे. यापूर्वी २०१३ साली ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनीही भारत दौऱ्यावर असताना जालियनाला बाग हत्याकांडाबद्दल खेद व्यक्त केला होता.

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात १३ एप्रिल १९१९ रोजी बैसाखीच्या दिवशी अमृतसर येथील जालियनवाला बागेत सभेचे आयोजन करण्यात आले होते. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरोधात सभेसाठी सुमारे १५ ते २० हजार नागरिक जालियनवाला बागेत जमले होते. मात्र, यामुळे खवळलेल्या ब्रिटीश अधिकारी जनरल रेगिनाल्ड ई. एच. डायर याने बागेतून बाहेर निघण्यासाठी असणाऱ्या एकमेव रस्त्याची नाकाबंदी केली. डायरने सैनिकांना नागरिकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले. यावेळी ५० सैनिकांनी १६५० फैरी झाडल्या. यामध्ये एक हजार भारतीय नागरिक शहीद झाले. तर ११०० जण जखमी झाले होते.

1,338 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग