संत गजानन रुग्णालयाला ‘एनएबीएच’कडून मानांकन…

गडहिंग्लज प्रतिनिधि  : महागांव (ता.गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला  एनएबीएच (नॅशनल ऑक्रिडेटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल, हेल्थ केअर  प्रोव्हायडर) दिल्ली यांच्यावतीने  सर्वोत्कृष्ट मानांकनाने  गौरवण्यात आले. याबबतचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये मानांकन मिळवणारी एकमेव हॉस्पिटल असल्याची माहिती डॉ. यशवंत चव्हाण आणि डॉ. प्रतिभा चव्हाण यांनी दिली.

शिवभावे जीवसेवा हे ब्रीद वाक्य घेवून  महागांव येथील आण्णासाहेब चव्हाण  यांनी १९९७ साली हॉस्पिटल रिसर्च सेंटरची स्थापना केली. गडहिंग्लज उपविभागातील ग्रामीण भागात अत्याधुनिक सुविधा आणि माफक दरामुळे हे हॉस्पिटल गरीब व गरजू रुग्णांना जीवनदायनी ठरले आहे. आज या रुग्णालयात ५० बेडची सुविधा आहे.

यावेळी आलेल्या कमिटीकडून नोव्हेंबर महिन्यात रुग्णालयाची तपासणी करण्यात आली. हॉस्पिटलची प्रयोगशाळा, ऑपरेशन थिएटर, इमारत, स्वच्छता, तात्काळ सेवा, प्रसूतिगृह, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची तत्परता, एनआयसीयु बेबी सेंटर, ओपीडी, प्रमाणीत डॉक्टर व परीचारीका आदी बाबींचा काटेकोर तपासणी केल्यानंतर हे रुग्णालय सर्वोत्कृष्ट मानांकनास पात्र ठरले आहे.

डॉ.यशवंत चव्हाण  म्हणाले की, या मानांकनामुळे शासनाच्या विविध योजनेच्या राज्याबरोबरच इतर राज्यातील रुग्णांनाही मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे. सध्या येथे प्रती महिन्याला १५० हुन अधिक वेगवेगळ्या शस्त्रक्रिया पार पडतात. मागील दोन वर्षाचा आकडेवारी पाहता  सहा हजारांहून अधिक शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. यासाठी येथील डॉक्टर्स,परिचारिका, कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले असल्याचे सांगितले.

यावेळी संस्थाध्यक्ष  अण्णासाहेब चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, डॉ. सुरेखा चव्हाण, सचिव बाळासाहेब चव्हाण यांच्यासह  डॉक्टर्स उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram