‘पी. एम. मोदी’ला निवडणूक आयोगाचा दणका…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविध पक्षांकडून आणि स्तरातून होत असलेल्या वाढत्या विरोधामुळे अखेर निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित ‘पी. एम. मोदी’ हा चित्रपट निवडणुकीच्या काळात प्रदर्शित करण्यास मनाई केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित केल्यास त्याचा मतदारांवर परिणाम होऊ शकतो हा दावा मान्य करण्यात आला आहे.

या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानं ‘यू’ प्रमाणपत्र दिलं होतं. या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली होती आणि चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात टोलवला होता. लोकसभा निवडणुकीच्या काळात चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळत निवडणुकीच्या काळात चित्रपट प्रदर्शित झाल्यास आचारसंहितेचा भंग होईल का, याचा निर्णय निवडणूक आयोगानं घ्यावा असं स्पष्ट केलं होतं. अखेर लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन निवडणूक आयोगानं ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचं प्रदर्शन रोखण्याचा निर्णय घेतला आहे. 

1,122 total views, 18 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram