आता सुप्रीम कोर्टालाही वाटतंं, चौकीदारच चोर आहे : राहुल गांधी

0 3

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. आता केवळ देशालाच नाही तर सुप्रीम कोर्टालाही वाटतं की चौकीदारच चोर आहे, असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी पुन्हा खुल्या चर्चेचं आव्हान दिलं. पंतप्रधानांनी फक्त १५ मिनिटं माझ्याशी खुली चर्चा करावी असं राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांना चर्चेची का भीती वाटते, असा सवालही त्यांनी केला. सरकारने कितीही ठरवलं तरी ते आता काहीही दडवू शकणार नाहीत असंही ते म्हणाले. राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं मोदी सरकारला मोठा झटका दिला. याप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना राफेल प्रकरणी पुन्हा सुनावणी होईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं. शिवाय, याप्रकरणामध्ये नव्या पुराव्यांच्या कागदपत्रांवर घेतलेला आक्षेप सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावला आहे.

त्यामुळे मोदी सरकारला मोठा धक्का बसला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर काँग्रेसनं भाजपला लक्ष्य करत ‘अब होगा न्याय’ असं म्हटलं आहे. तसेच, मोदी सरकारनं राफेलबाबतची माहिती सर्वोच्च न्यायालयापासून लपवून ठेवली. पण, न्यायालयाच्या निर्णयामुळे न्याय मिळेल असं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

 राफेल खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. या संदर्भात यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि वकील प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टानं या प्रकरणी कुठलाही संशयास्पद व्यवहार झाला नाही असं म्हणत सर्व याचिका फेटाळल्या होत्या. त्यानंतर सिन्हा, शौरी आणि प्रशांत भूषण यांनी नवी कागदपत्रे कोर्टात सादर करत या आधीच्या निकालाचा फेरविचार करावा अशी मागणी करणारी याचिका त्यांनी दाखल केली होती. आता सुप्रीम कोर्ट ही नवी कागदपत्रे पाहून या प्रकरणाची चौकशी करायची किंवा नाही याबाबत आदेश देणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More