Breaking News

 

 

पिस्तुल हिसकावणाऱ्या काळेसह चौघांना अटक : डॉ. अभिनव देशमुख

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  यादवनगर भागात बेकायदेशीर सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकण्यास गेलेल्या पथकावर हल्ला करुन पोलीस कर्माचाऱ्याकडून पिस्तुल हिसकावणाऱ्या निलेश काळेसह त्याच्यासोबत असलेल्या सुंदर दाभाडे, जावेद मुल्ला आणि सलमान मुल्ला यांना  पकडण्यात पोलीसांना यश आले असून या प्रकऱणातील पिस्टल व त्यामधील पाच राऊंड पोलीसांनी हस्तगत केले असल्याची माहिती पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत दिली.

यादनगरात ८ एप्रिल रोजी प्रशिक्षणार्थी अतिरिक्त पोलीस अधिक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्या पथकाने सलीम मुल्ला व त्याचे भाऊ चालवत असलेल्या मटका अड्ड्यावर धाड टाकली. यावेळी सलीम मु्ल्लाची पत्नी माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवीका शमा मुल्ला यांच्यासह ४० मुल्ला समर्थकांनी पोलीसांवर हल्ला आणि गोंधळ घातला होता. तसेच पोलीस कर्मचारी निरंजन पाटील यांच्याकडील पिस्टल हिसकावून घेतले.

याप्रकऱणातील नगरसेविका शमा मुल्लासह २५ जणांना अटक केली असून इतर १० ते १५ जणांचा समावेश असल्याने त्यांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यापैकी पिस्टल हिसकावणारा मुख्य आरोपी निलेश काळे तसेच राजू मुल्ला, सुंदर दाभाडे, जावेद मुल्ला हे घटने दिवशी पळून गेल्यानंतर आज सकाळी लक्षतिर्थ वसाहत येथे जमून कोल्हापूर शहर सोडून बाहेर जाण्याच्या तयारीत होते. याबाबत पोलीसांना माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडील पथकाने लक्षतिर्थ वसाहत येथे या चौघांचा शोध सुरु केला.

त्यावेळी चारही आरोपी दोन मोटरसायकलवरुन जात असल्याचे दिसले. त्यांनी पोलीसांना पाहून मोटरसायकलवरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण हवालदार राजू आडुळकर यांनी मागे बसलेल्या निलेश काळे याला झेप घालून पकडले. इतर तिघे मोटरसायकलसह शिंगणापूरच्या दिशेने गेले. त्यांचा पाठलाग केला असता पुढे रस्ता संपल्याने मोटरसायकली तिथेच टाकून तिघेही उसाच्या शेतात लपण्यासाठी गेले. पोलीसांनी शेताला घेराव घालून राजू मुल्ला, सुंदर दाभाडे यांना पकडले. तत्पूर्वी राजारामपुरी पोलीसांनी सलमान मुल्ला याला अटक केली असून राजू मुल्ला मात्र मिळून आला नाही.

या कारवाईत पोलीस उपनिरिक्षक सचिन पंडीत, राजेंद्र सानप, दादा पवार, राजू आडुळकर, राजू हंडे, रणजीत कांबळे, अजित वाडेकर, रमेश डोईफोडे, रोहित पवार, किरण शिंदे आदींनी भाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा