किणी टोल नाक्यावर अमन मित्तल यांच्या पथकाला धक्काबुक्की, शिवीगाळ

पेठवडगांव (प्रतिनिधी) : किणी (ता. हातकणंगले) येथील पथकर नाक्यावर  कर्मचाऱ्यांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे. निवडणुक कामाच्या पथकाला पथकरासाठी त्यांनी थांबवून ठेवले.  तसेच एका अधिकाऱ्याला  धक्काबुक्की करून शिवीगाळही केली. यावेळी या गाडीत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासहीत पाच अधिकारी होते. त्यामुळे शासकीय कामकाजात अडथळा आणल्याबद्दल पथकराच्या दोन कर्मचाऱ्यांच्या विरोधात वडगांव पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार काल (सोमवार) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडला. 

याप्रकरणी विजय शामराव शेवडे (रा.घुणकी) यास अटक करण्यात आली असून त्याचा सहकारी फरारी आहे. या घटनेची फिर्याद जिल्हा परिषदेचे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राहूल कदम यांनी दिली आहे. 

काल जि.प.चे मुख्य कार्यकारी अमन मित्तल व इतर अधिकारी इस्लामपूरहून गाडी क्रमांक (एमएच ०१ बीटी ९०३२) ने कोल्हापूरला येत होते. रात्री ११ च्या सुमारास किणी पथकर नाक्यावर लेन क्रमांक सात वरून जात असताना अधिकाऱ्यांनी शासकीय ओळखपत्र दाखवून सोडण्याची विनंती केली. मात्र येथील कर्मचारी विजय शेवडे व त्याचा अज्ञात सहकारी यांनी  राहूल कदम यांना धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली. तसेच निवडणुकीच्या कामकाजासाठी असलेले वाहन अडवून ठेवले. त्यामुळे शासकीय कामकाजात अडथळा आणला.  याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत शेवडे यास अटक केली आहे.

पथकर कर्मचाऱ्यांच्या मुजोरीचा व अरेरावीचा अनुभव पोलिस अधिकारी, वरिष्ठ प्रशासकिय अधिकारी, लोकप्रतिनिधींनाही बसत आहे. यामुळे किणी टोल नाक मुजोरी  थांबणार तरी कधी असा सवाल उपस्थित होत

One thought on “किणी टोल नाक्यावर अमन मित्तल यांच्या पथकाला धक्काबुक्की, शिवीगाळ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram