Breaking News

 

 

जोतिबा यात्रेतील सहजसेवा आता नवतरुणांच्या हाती…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  गेली १८ वर्षे चैत्र पोर्णिमेच्या जोतीबा यात्रेमध्ये महाप्रसाद, आरोग्यसेवा, रक्तदान, जनावरांना वैरण-पाणी देणाऱ्या सहससेवा ट्रस्टने यावर्षीही १७ ते २० एप्रिल दरम्यान आपल्या उपक्रमाची जय्यत तयारी केली असून यावर्षी या सहजसेवेचे संपूर्ण नियोजन नवतरुणांच्या हाती दिले असल्याची माहिती सन्मती मिरजे, प्रमोद पाटील, चिंतन शहा यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत दिली.

सहजसेवा ट्रस्टचे यंदाचे १९ वे वर्ष आहे. अठरा वर्षांपूर्वी पन्नाशीत असलेल्या सन्मती मिरजे आणि त्यांचे सहकाऱ्यांनी सुरु केलेली ही सेवा यापुढेही अखंडीत रहावी, यासाठी या वर्षीपासून सहजसेवेचे संपूर्ण नियोजन नवतरुणांच्या हाती दिल्याचे प्रमोद पाटील यांनी सांगत यावर्षी १७ एप्रिल रोजी महाप्रसाद सुरु होत आहे. १९ एप्रिल हा यात्रेचा मुख्य दिवस असून २० एप्रिलपर्यंत महाप्रसाद, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, जनावरांना वैरण-पाणी यासह यात्रेकरुंना विविध सेवा देणाऱ्या पोलीस, शासकीय कर्मचारी, महावितरण कर्मचारी, टु व्हिलर मॅकॅनिक आदींसाठी विशेष सेवा उपलब्ध करुन दिली आहे.

यात्रा काळात वळीव पाऊस येण्याची शक्यता लक्षात घेवून गायमुख परिसरात १५ हजार स्केअर फुटांचा भक्कम मांडव घालण्यात आल्याचे सांगितले. दरवर्षीप्रमाणे सहजसेवा ट्रस्टकडे समाजातील विविधस्तरातील लोकांच्याकडून मदतीचा ओघ सुरु झाला आहे.

यावेळी रोहित गायकवाड, मनिष पटेल, चेतन परमाळ, अनिकेत पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे