Breaking News

 

 

खा. महाडिकांना हत्तरकी गटाचा जाहीर पाठींबा…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी इथे हत्तरकी गटाचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला श्रीमती रेखाताई हत्तरकी, सदानंद हत्तरकी यांची प्रमुख उपस्थिती होती.  यावेळी सदानंद हत्तरकी यांनी खा. धनंजय महाडिकांना पाठिंबा जाहीर केला.

सदानंद हत्तरकी म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध असणारे खा. महाडिक यांना निवडून आणण्यासाठी संपूर्ण हत्तरगी गट त्यांच्या पाठीशी आहे. गेल्या पाच वर्षात कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यास सुरुवात झाली आहे, हे विकासचक्र थांबता कामा नये. यासाठी खा. महाडिकांना पुन्हा निवडून देणे हे आपले कर्तव्य असल्याचे, त्यांनी सांगितले.

यावेळी वरदशंकर वर्धापगोळ, गंगाधर व्हसकोटी, वसंत नंदनवाडे, श्रीमती विलासमती शेरवी, रूपाली कांबळे, मलगोंडा पाटील, चंद्रशेखर पाटील, तमाण्णा पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे