Breaking News

 

 

टीका कशी पचवायची ते माझ्याकडून शिका : रामदास आठवले

नागपूर (प्रतिनिधी) : आठवले को काँग्रेस पार्टीने दे दिया धोका, लेकीन मोदींनी दिया मौका, अशी कविता सादर करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज (मंगळवार) नागपूरातील सभेत काँग्रेसवर टीका केली.  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी आज नागपूरात भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी हजेरी लावली होती.

रामदास आठवले म्हणाले, नितीन गडकरी विकास पुरुष असून ते सर्वांचे लाडके नेते आहेत. देशात काँग्रेसच्या वतीने भ्रष्टाचार झाला. महायुतीने काँग्रेस विरोधात मोर्चा उघडला. राहुल गांधी सातत्याने आमच्यावर टीका करीत आहे. पण ती टीका कशी पचवायची ते माझ्याकडून शिका, असेही त्यांनी सांगितले.

लोकशाहीत तुम्हाला बोलायचं अधिकार आहे. जेवढे तुम्हाला बोलायचं आहे तेवढे बोला, या निवडणुकीत तुम्ही सर्वांनी यांचे पोल खोला. गरीबी कशी हटवणार कशी, तुम्ही गरिबांना हटवला. मी सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार यांच्यासोबत होतो. पण तुम्ही माझे सामान बाहेर काढले. मग मी ठरवले की तुम्हाला सत्तेतून बाहेर काढतो, असे आठवले यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे