Breaking News

 

 

किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आरएसएस नेत्याचा मृत्यू…


श्रीनगर (वृत्तसंस्था) :  जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्हा रुग्णालयात आज (मंगळवार) दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते चंद्रकांत शर्मा यांचा मृत्यू झाला. किश्तवाड येथे आज दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. यावेळी रुग्णालयात शिरलेल्या दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार केला. यामध्ये चंद्रकांत शर्मा आणि त्यांचा सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. तर चंद्रकांत शर्मा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला होता. 

या घटनेमुळे काश्मीर खोऱ्यातील तणाव वाढण्याची शक्यता आहे. चंद्रकांत शर्मा यांना मारण्यासाठीच हा हल्ला करण्यात आला होता. बुरखा परिधान करून दहशतवादी रुग्णालयात शिरले. ओपीडीमध्ये येऊन या दहशतवाद्यांनी चंद्रकांत यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यात चंद्रकांत गंभीर जखमी झाले तर त्यांचा बॉडीगार्ड जागीच ठार झाला. गोळीबारानंतर सुरक्षारक्षकाकडील शस्त्र घेऊन हे दहशतवादी पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. या घटनेनंतर जमावाने रुग्णालयाबाहेर पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी केल्याचेही समजते. या पार्श्वभूमीवर किश्तवाडमध्ये लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे