कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्रावण महिन्यानिमित्त ‘श्रावणी नैवेद्य स्पर्धा’ आणि ‘बाळकृष्ण वेशभूषा स्पर्धा’ घेऊन महिलांच्या आनंदात खऱ्या अर्थाने रंग भरण्याचे आणि महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे काम स्वयंप्रभा मंच करत आहे, असे प्रतिपादन ‘खातू मसालेचे’ शाळीग्राम खातू यांनी केले. शाहू स्मारक भवन येथे ‘स्वयंप्रभा मंच’ व ‘रोटरी क्लब ऑफ होरायझन’ यांच्यावतीने आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

‘दत्तात्रय परशराम माने सराफ’ यांच्या वतीने प्रथम विजेत्या स्पर्धकास ‘सोन्याची नथ’ इतर विजेत्यांना चांदीची नाणी आणि बाल राधा-कृष्ण वेशभूषा स्पर्धेतील विजेत्यांना कृष्ण व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चांदीच्या मूर्ती व्यवस्थापक विद्या जगताप यांच्या हस्ते देण्यात आल्या. रोटरी क्लब होरायझन व कोल्हापूर रोटरी मुव्हमेंटचे अध्यक्ष संजय साळोखे, सेक्रेटरी सागर बकरे, दीपक करगुपीकर, श्रीकांत हिरवे, टॉक्समो ई बाईकचे प्रेम बनसोडे, परीक्षक मंजिरी कपडेकर, प्रतीक बावडेकर, डॉ. शक्ति पातकर, संज्योत जमदग्नी, चित्रकार विजय टिपुगडे उपस्थित होते. सूत्रसंचालन अक्षय जहागीरदार यांनी केले.

मंचच्या अध्यक्ष सारिका बकरे, कार्याध्यक्ष शुभदा हिरेमठ यांनी मनोगत व्यक्त केले. बक्षीस वितरणप्रसंगी ‘रंग श्रावणाचे’ हा हिंदी मराठी पाऊस गाण्यांचा कार्यक्रम झाला. पदव्युत्तर संगीत विभाग पुणे, ना. धा. ठाकरसी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थिनी मिताली सातोंनकर, सानिका फडके, अपूर्वा कुलकर्णी, श्रेया कुलकर्णी, शिवानी कुलकर्णी या कलाकारांनी ही गाण्याची मैफल रंगवली. स्वरसाजासाठी हार्मोनियम- सीताराम जाधव, सिंथेसायझर- आकाश साळोखे, तबला- गुरू ढोले, ऑक्टोपॅड- मनोज जोशी यांनी साथ दिली. निवेदन माधुरी केस्तीकर यांनी केले. ध्वनी संयोजन श्रीधर जाधव आणि नेपथ्यची बाजू मिलिंद अष्टेकर यांनी सांभाळली.

स्पर्धेचा निकाल : श्रावणी नैवेद्य स्पर्धा : प्रथम- मुक्ता कुलकर्णी, द्वितीय- मनीषा मालणकर, तृतीय- वसुधा हर्डीकर, उत्तेजनार्थ- शैलजा गिरीगोसावी, वंदना लाड.

कृष्ण वेशभूषा स्पर्धा : (१ ते ६ वयोगट )- प्रथम- तनिष्क गुरव, द्वितीय- अयांश भिंगार्डे, तृतीय- नुरवी शिंगे, उत्तेजनार्थ- पूर्वी चौगुले, प्रितांश जैन, कान्हा गांधी, विशेष बक्षीस- मानवीक पाटील, विश्वराज शिंदे

राधा वेशभूषा स्पर्धा : (१ ते ६ वयोगट )- प्रथम- अनविका घाटगे, द्वितीय- ईश्वरी जगताप,  तृतीय- तियारा गांधी, उत्तेजनार्थ- प्रांशी कुलकर्णी, अन्वी गायकवाड

कृष्ण वेशभूषा स्पर्धा : (७ ते १२ वयोगट )- प्रथम-  नैतिक गोडबोले, द्वितीय- नंदिनी सोहनी, तृतीय- रुद्र शिंदे, उत्तेजनार्थ- रणवीर वेर्णेकर

राधा वेशभूषा स्पर्धा : (७ ते १२ वयोगट)- प्रथम- राजवी पाटोळे, द्वितीय- ऋग्वेदा मोरे, तृतीय- राजेश्वरी कातवरे, उत्तेजनार्थ- आराध्या गुरव.