Breaking News

 

 

मी धनंजय महाडिक यांच्या पाठीशी – पी. एन. पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असून खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे कोणीही दुसरा विचार करू नये असे आवाहन माजी आ. पी. एन. पाटील यांनी केले. ते करवीर तालुक्यातील पिरवाडी येथील  प्रचार मेळाव्यात बोलत होते.

यावेळी पाटील म्हणाले की, करवीर तालुका आणि जिल्ह्यातील काँग्रेस एकदिलाने खा. धनंजय महाडिक यांच्या पाठीशी आहे. महाडिक यांना विजयी करण्यासाठी आज आपण सर्वजण शपथ घेऊया असं आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या वेळी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, शंकर पाटील, सुभाष सातपुते, अश्विनी धोत्रे,संदीप पाटील, उदय पाटील, कृष्णात धोत्रे, अजित खोत,सरपंच साताप्पा लाड, बाजीराव जाधव, उत्तम चव्हाण, प्रकाश पवार यांच्यासह मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

2,334 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे