कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिष्य धर्मवीर आनंद दिघे यांना आज पुण्यतिथीनिमित्त राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापुरात शिवसेनेच्या वतीने  यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार तळागाळात पोहोचवण्याचे काम धर्मवीर आनंद दिघे यांनी केले. आपल्या कृतीतून गोरगरीब सर्वसामन्य जनतेला न्याय देण्याच काम दिघे यांनी केले असून, बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना अपेक्षित हिंदुत्व आणि समाजहिताचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, शिवाजी जाधव, जयवंत हारुगले, किशोर घाटगे, रणजीत जाधव, रमेश खाडे, मंगलताई साळोखे, पूजाताई भोर, शारदा भांदिगरे, पूजा कामते, उदय भोसले, हिंदू एकताचे चंद्रकांत बराले, उदय घोरपडे आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.