‘पीएम मोदीं’बाबत नो कॉमेंटस् ! निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा… : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘पीएम मोदी’ चित्रपट गेल्या काही दिवसांपासून भलताच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून चित्रपटाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. चित्रपटाबद्दल दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांना सर्वोच्च न्यायालयाकडून पूर्णविराम देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोणतेही भाष्य करण्यास नकार दिलेला आहे. निवडणूक आयोगाने पुढील निर्णय घ्यावा, असे सांगत न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाची जबाबदारी निवडणूक आयोगाकडे सोपवली आहे.

निवडणुकीच्या काळात आचार संहिता उल्लंघन होते की नाही, याचा निर्णय निवडणूक आयोग घेणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे चित्रपटाचे निर्माते आणि प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

या चित्रपटात शीर्षक भूमिकेत विवेक ओबेरॉय असून दर्शनकुमार, बोमन ईराणी, झरीना वहाब, मनोज जोशी, प्रशांत नारायण, अंजन श्रीवास्तव, राजेंद्र गुप्ता आणि यतिन कर्येकर यांनीही या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले आहे.

435 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram