Breaking News

 

 

भाजपचे संकल्पपत्र अहंकारानं भरलेलं… : राहुल गांधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंद दाराआड तयार करण्यात आलेल्या भाजपच्या संकल्पपत्रात दूरदृष्टीचा अभाव आहे. हे संकल्पपत्र अहंकाराने भरलेलं आहे,’ अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. 

भाजपने संकल्पपत्र या नावाने त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात जम्मू-काश्मीरमधील ३७०, ३५अ कलम रद्द करण्यापासून ते राम मंदिर बांधण्यापासूनच आश्वासन दिलं आहे. त्यावर राहुल गांधी यांनी ट्विटरवरून टीका केली आहे. भाजपचा निवडणूक जाहीरनामा बंद दाराआड बनविण्यात आला आहे. एकांगी विचाराने हा जाहीरनामा प्रेरित आहे. त्यात दूरदृष्टीचा अभाव असून अहंकाराने भरलेला हा जाहीरनामा आहे असे त्यांनी ट्विटरवरून म्हटले आहे.

याउलट काँग्रेसचा जाहीरनामा लोकांशी चर्चा करून तयार करण्यात आला आहे. त्यात सशक्त भारतीयांचा आवाज आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात नेमका त्याचाच अभाव आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

561 total views, 12 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग