Breaking News

 

 

मतदार जनजागृतीसाठी कोल्हापुरात साकारली मानवी रांगोळी…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिकेने लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती मोहीम राबवली आहे. आज (मंगळवार) सकाळी ७:३० वाजता महात्‍मा गांधी मैदानावर मानवी रांगोळी साकारण्यात आली. यामध्ये शहरातील सुमारे ६ हजार शालेय विद्यार्थ्यांनी सहभागातून घेतला होता. यावेळी देश का महात्‍यौहार या आशयाची महारांगोळी काढण्यात आली. 

याचा शुभारंभ जिल्‍हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्‍थित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रिन्सेस पद्‍माराजे गर्ल्स हायस्‍कूल, एम.एल.जी हायस्‍कूल, प्रिन्सेस इंदुमतीदेवी हायस्‍कूल, मनपा पी. बी. साळूंखे विद्‍यालय, एम.एस.लोहिया हायस्‍कूल, प्रायव्हेट हायस्‍कूल, विद्‍यापीठ हायस्‍कूल, विमला गोयंका इंग्‍लिश मीडियम स्‍कूल, इंदिरा गांधी हायस्‍कूल, कोल्‍हापूर हायस्‍कूल यांच्यासहीत अनेक शाळेचे विद्‍यार्थी, विद्‍यार्थिनींनी या मानवी रांगळीत आपला सहभाग नोंदवला होता. 

यावेळी विविध शाळांतील, विविध रंगांच्या गणवेशातील विद्‍यार्थी मोठ्‍या उत्‍साहात या उपक्रमात सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी साकारलेली देश का महात्‍यौहार या आशयाची महामानवी रांगोळी पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.

468 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा