विद्यावर्धिनी इन्स्टिट्यूटचा ‘बेस्ट पॉलिटेक्निक कॉलेज’ पुरस्काराने गौरव…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पाल (ता. भुदरगड) येथील विद्यावर्धिनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेस महाराष्ट्रातील ‘बेस्ट पॉलिटेक्निक कॉलेज’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आशिया एज्युकेशन सुमित आणि इंडिया टुडे यांच्या विद्यमाने दिल्ली येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.

या वेळी माजी केंद्रीय मंत्री मुरलीमनोहर जोशी यांच्या हस्ते संस्थेचे प्राचार्य प्रा. डी.बी.केस्ती यांना सन्मान पत्र व ट्रॉफी प्रदान करण्यात आली. तसेच संस्थेचे ट्रस्टी एन. एस. हिरुगडे उपस्थित होते. या समारंभास अभिनेते गुलशन ग्रोव्हर, भारतीय प्रो  कुस्तीपटू पद्मश्री बजरंग पुनिया,  एआयसीटीईचे मेंबर सचिव ए.पी.मित्तल, अखिल भारतीय आतंकवाद विरोधी पथकाचे चेअरमन मनिंदरजितसिंग बिट्टा यांचेसह मान्यवर उपस्थित होते.

या पुरस्कारानंतर संस्थेचे अध्यक्ष एम. पी. बाऊस्कर यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्याचे अभिनंदन केले. तसेच सर्व थरातून संस्थेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

 

132 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram