Breaking News

 

 

अनिल गोटे यांचा अखेर भाजपला रामराम…

धुळे (प्रतिनिधी) : मागील अनेक दिवसांपासून भाजपमध्ये अस्वस्थ असलेले आणि भाजप नेत्यांवर नाराज असलेले धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी अखेर आज (सोमवार) पक्षाला रामराम ठोकला. आज त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

धुळे महानगरपालिका निवडणुकीपासून गोटे यांनी स्वपक्षाविरोधात आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्यावर सातत्याने ते टीका करत होते. अखेर त्यांनी आज (सोमवार) पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे तर आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे पाठवला आहे.

आणि भामरे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. नंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीही भेट घेतली होती. त्याचवेळी ते भाजपा सोडतील, असे बोलले जात होते. अखेर त्यांनी आज पक्षाचा राजीनामा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash