कोल्हापूर मतदारसंघाचे चित्र स्पष्ट : १५ उमेदवार रिंगणात

0 1

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोकसभेच्या निवडणूकीसाठी कोल्हापूर मतदार संघात ७ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे १५ उमेदवार रिंगणात राहिले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत दिली.  आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. 

देसाई यांनी सांगितले की, कोल्हापूर मतदारसंघात एकूण २२ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ७ जणांनी माघार घेतल्याने १५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचे खा. धनंजय महाडिक (राष्ट्रवादी-काँग्रेस), प्रा. संजय मंडलिक (शिवसेना), प्रा. डी.श्रीकांत (बहुजन समाज पार्टी) हे तीन आहेत.

तर पक्ष मान्यता नसलेले पण नोंदणीकृत असलेल्या राजकीय पक्षाचे डॉ. अरुणा माळी (वंचित बहुजन आघाडी), किसन काटकर (बळीराजा पार्टी), दयानंद कांबळे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), नागरत्न सिद्धार्थ (बहुजन मुक्ती पार्टी) हे चार उमेदवार आहेत. याशिवाय परेश भोसले, बाबुराव नाईक, अरविंद माने, मुश्ताक मुल्ला, युवराज देसाई, राजेंद्र कोळी, संदीप संकपाळ, संदीप कोगले हे सहाजण अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.

एकूण १५ उमेदवार व १ नोटा असे १६ नावे एका मतदान यंत्रावर बसणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More