Breaking News

 

 

कलम ३७० कसे रद्द करता ते पाहतोच ! : फारुख अब्दुल्लांंची धमकी

श्रीनगर (वृत्तसंस्था) : भाजपने काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करण्याचे आश्वासन आज (सोमवार) प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात दिले आहे. यावरून भाजपवर टीकेची झोड उठविताना नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी फुटीरतेचे फुत्कार टाकले आहेत. कलम ३७० कसे रद्द करता तेच पाहतो. आम्ही पण तयार आहोत विरोध करायला. पाहू या कोण मग यांचा झेंडा उभा करण्यासाठी तयार होतो असे आवाहन दिले आहे. त्याचप्रमाणे हे कलम रद्द केल्याने जम्मू-काश्मीर भारतापासून वेगळे होईल, असेही ते बरळले आहेत.

भाजपाने आज आपल्या जाहीरनाम्यात संविधानातील कलम ३७० रद्द करण्याचा पुनरुच्चार केला आहे. यानंतर फारुख अब्दुल्ला यांनी हे आज एका प्रचारसभेत हे विधान केले. बाहेरून लोक आणून येथे वसवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि आम्ही शांत बसू? आम्ही याला प्रतिकार करू. कलम ३७० कसे रद्द करता ते पाहतो. अल्लाहची शपथ घेऊन सांगतो, अल्लाहला देखील हेच मंजूर असेल की आम्ही यांच्यापासून वेगळे व्हावे, असे फुत्कार फारूख अब्दुल्ला यांनी सोडले. तसेच कलम ३७० रद्द करूनच दाखवा, आम्ही पण तयार आहोत विरोध करायला. पाहू या कोण मग यांचा झेंडा उभा करण्यासाठी तयार होतो, अशी भाषा वापरत अब्दुल्ला यांनी धमकीच दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे